सुस्वागतम्

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

स्व भाषा मराठीची दुरावस्था

मातृभाषे बद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात
||माझ्या मर्हाठीच्या बोलू कवतुके परि अमृताते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन||
अशी हि आपली मातृभाषा मराठी भाषा आज वेगळ्या वळणावर येऊन प्रवास करत आहे, समस्त आपल्या पुत्रांना साद घालतेय व आपली व्यथा सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण तिच्या पुत्रांना तिच्यासाठी वेळ काढायला फुरसतच नाही!!!!!
कविवर्य सुरेश भट म्हणतात "लाभले भाग्य बोलतो मराठी | जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी || धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी | एवढ्या जगात माय मानतो मराठी||
स्वातंत्र्यपूर्वकालपासून या देशातील शिक्षणपद्धती बदलली पाहिजे , असा आक्रोश सर्वत्र चालू आहे. मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम राहील ही मागणी राज्यकर्त्यांनी मान्य केली होती. परंतु उच्च शिक्षणाचे इंग्रजीचे स्तोम कायम ठेवून शालान्त शिक्षणापर्यंत मातृभाषेचा स्वीकर करून समाजाच्या तोंडाला पाने मात्र पुसण्यात आली. लोकांची मागणी मान्य केल्याचे चित्र मात्र उभे करण्यात आले. निर्णय घेणाऱ्या संबंधितांनी मात्र आपल्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळाच पसंत केल्या व अधिकाराची क्षेत्रे वंशपरंपरेने आपल्याकडेच राहतील अशी व्यवस्था केली. अशाप्रकारे राज्यशासनात इंग्रजीचे महत्त्व वाढल्यामुळे परिणाम असा झाला की, महाराष्ट्रातल्या मुंबईसारख्या शहरांकडे परप्रांतीय इंग्रजीप्रेमी लोकांची रीघ लागली. या परप्रांतीयांना सुवर्णसंधीच मिळाली. या मंडळींनी मुंबई शहरावर ताबा मिळविला, हे स्वातंत्र्योत्तर काळातील चित्र आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, अशा मंडळींनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आश्रय घेतला. आपल्या मुलांच्या भावितव्याचा विचार करण्याइतकी सवड असणाऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलानांही या शाळेत पाठविले. यामुळेच मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या राहिल्या व या पापात भर पडली. खरे म्हणजे सुरूवातीपासून इंग्रजी या एका विषयाचा उत्तम अभ्यास त्यांनी केला तर इंग्रजी विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. मराठी तरुण पिढीने इंग्रजी भाषेचा उत्तम अभ्यास करावा, पण इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरू नये.

आपण सर्वांनी प्रथम  हे जाणून घेतले  पाहिजे कि इंग्रज ज्यावेळी ह्या भारत देशात आले, त्यावेळी ते ठरवूनच आले कि या देशास  स्वतंत्र दिल्यानंतर हा देश त्यांची अस्मिता, सांस्कृतिक परंपरा विसरून आपल्या भाषेच्या दास्यातून कधीच मुक्त होणार नाही याची तजवीज करण्याची काळजी त्यांनी घेतली होती. गवर्नर  लॉर्ड मेकॉले याच्या भाषणातून आपल्याला जाणवते.   त्याचा हेतू चांगला नव्हता २ फेब्रु. १८३५ ला ब्रिटीश पार्लमेंट मध्ये त्याने केलेल्या भाषणात तो म्हणाला :
I have travelled across the length and breadth of India, and I have not seen one person who is a beggar, who is a thief.  Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such high calibre, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage; and therefore , I propose that we replace her old and ancient educatioin system, her culture, for if the Indians think that in foreign and
English is good and greater than their own, they will lose their own self esteem, their native self-culture and they will become what we want them, a truly dominated nation.

 हीच लोड मेकॉलेची शिक्षण पद्धती शासन दरबारी रूढ होऊन आज आपल्या मानगुटीवर बसली आहे.
यावर आपले मत प्रदर्शित करताना पण कोणत्याही प्रकारचा विरोध अथवा कृती न करता महात्मा गांधीनी १९२१ साली त्यांचा "यंग  इंडिया" मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले  :
परक्या भाषेच्या माध्यमाने आमच्या मुलांच्या बुद्धीवर आणि त्यांच्या एकून शक्तीवर विलक्षण ताण पडून ती  थकून जातात .  हे परके माध्यम त्यांना केवळ पोपटपंची आणि अनुकरण करायला शिकवते. कोणत्याही प्रकारचा  मुलभूत विचार अथवा कृती करण्यास ती असमर्थ ठरतात आणि आपले ज्ञान आपल्या लोकापर्यंतच नव्हे तर कुंटबियापर्यंतहि पोहोचू शकत नाहीतपरक्या भाषेच्या माध्यमाने हि मुले आपल्या स्वत:च्या देशातच परकी झालेली आढळतातहा मोठाच दैवदुर्विलास आहेह्या परक्या भाषेने देशीय भाषांची वाढच कुंठीत केली आहेमला जर सर्वंकष सत्ता प्राप्त झाली तर मी प्रथम हि परक्या भाषेतून शिकवण्याची पद्धत ताबडतोब बंद करीन आणि मातृभाषेतून शिकवण्याची सक्ती करीनपाठ्यपुस्तकासाठी मी थांबणार नाहीती या बदलामागोमाग येतीलच. परक्या भाषेचे हे संकट ताबडतोब दूर होणे आवश्यक आहे

मराठी भाषा  हीच मातृभाषा म्हणून शिक्षणाचे माध्यम हवे, कारण आपल्या भाषेतून जेवढे शिकता येईल तेवढे परकीय भाषेतून शिकणे लहान बालकांना जड जाईल.  घरात एक भाषा व शाळेत वेगळी भाषा लहान बालकांच्या मनावर परिणाम घडवून आणते व ते बालक सुरुवातीची काही वर्षे एका वेगळ्याच मानसिकतेतून जाते, ह्या  सर्व परिणामांना आपण पालकच सर्वस्वी  जबाबदार असतो.
मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मातृभाषा हेच शिक्षणाचे मध्यम असले पाहिजे हे समाजातील विचारवंतानी आणि अभ्यासकांनी मान्य केले आहे, असे असताना अनेक सामान्य जनतेचा ओढा परकीय भाषेकडे दिसून येतो.
महाराष्ट्रातच नाही भारताच्या इतर भागात इंग्रजी माध्यमाचे भूत भारतीयाच्या मनावर पकड घेत चालली  आहे. लहानग्यांच्या कोवळ्या निरागस मनाचा विचार करता आपली आर्थिक ताकद बघता इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्याकडे कल भारतीयांच्या मानसिकतेत दिसून येतो.

रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा आपल्या मातृभाषेबाबत म्हणताना असे  उधृत केले कि
शिक्षणाची भाषा आणि बालकाची भाषा यांच्यात फरक केलेला जगात भारताशिवाय दुसरा देश नाहीपाच्शात्य ज्ञानाकडे वळलेल्या जपानला पुरती शंभर वर्षेही लोटलेली नाहीत पण शिक्षणाकरिता स्वदेशीवर निर्भर राहायचे असा त्याचं निर्धार होता, कारण असले शिक्षण त्यांना काही निवडक नागरिकापुरते शोभेची वस्तू म्हणून नको होते तर सर्वच नागरिकांना समर्थ आणि सुसंकृत करण्यासाठी हवे होतेफारच थोड्यांच्या आवाक्यात येऊ शकेल असे परकी भाषामाध्यम  चालू ठेवण्याचा मूढपना तर त्यांनी मुळीच केला नाही.
मराठी या विषयावर मराठी जनतेला भडकावून राजकारण करणारे पक्ष अशा महत्वाच्या विषयावर सोयीस्कर दुर्लक्ष करताहेत व याचाच फायदा सरकारने घेऊन आपल्या मनमानी कारभाराने समस्त मराठी जनतेला वेठीस धरले आहे. मराठीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या समस्त मराठी जणांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे, अन्यथा आपल्या हातून वेळ गेलेली असेल.

४ टिप्पण्या:

Pranav Bhonde म्हणाले...

अभिनंदन भरतजी, तुम्ही अतिशय महत्वाच्या विषयावर मुद्देसूद लेखन केले आहे. शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले यावर विद्यार्थ्याचे भाषिक ज्ञान अवलंबून असेल; तर प्रत्येक भाषा शिकण्यासाठी त्या भाषेच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेऊन त्याचा अभ्यास करावा लागेल. विनोदाचा भाग सोडा..!! पण या व्यावहारिक सत्याचा विचार करणेच आपण थांबवले आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला दाखल करण्यात अनेक मराठी भाषिकांना कमीपणा वाटतो. या पालक वर्गात शिवसैनिक आणि मनसैनिक सुद्धा समाविष्ट आहेतच.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गुणात्मक शिक्षणाचा. आपल्याला देशासाठी सुजाण आणि व्यवहारकुशल नागरिक घडवायचे आहेत की पढतमुर्ख याचा सारासार विचार करणे सुद्धा गरजेचे वाटते. म्हणूनच क्रमिक अभ्यासासोबत व्यावहारिक विकासावर शिक्षकांनी भर देण्याची गरज आहे. त्याकरता शाळेचे तास वाढविण्याची अगर सदर विषयाची परीक्षा घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण अतिरिक्त उपक्रम राबवून ही कसर सहज भरून काढता येईल असे वाटते. या विषयाला वाचा फोडल्याबद्दल पुन्हा अभिनंदन !! असेच लिहित रहा अशा शुभेछ्हा !!!!!

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

khup chhan lekh lihila aahe dhnyvad

sunil bhumkar म्हणाले...

khup chhan lekh lihila aahedhnyvad

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

kharach khup chhan lekh lhila aahe dhnyavad