सुस्वागतम्

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

सोमवार, ८ जुलै, २०१३

श्री सद्गुरुवर्य समर्थ रामदास स्वामींना गुरुस्थानी मानावे असे शिवाजी महाराजांना सांगणारे तुकाराम महाराजांचे अभंग हे अभंग ! उठसूट समर्थांना अपशब्दांची लाखोली वाहणार्याा आणि समर्थ हे महाराजांचे गुरु नव्हते इत्यादी बरळणार्यां नी एकदा “तुकारामगाथे”तील हे अभंग वाचावे... ते अभंग पुढीलप्रमाणे :

विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥
युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥
ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥
शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥
व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥
हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥
याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥
अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥
वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥
रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥
तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥
ऐसी माझी वाणी दीनरूप आहे । करुणा त्या आहे हृदयस्थाशी ॥
न हो केविलवाणे, न हो आम्ही दीन । सर्वदा शरण पांडुरंगी ॥
पांडुरंग आम्हा पाळीता पोशिता । आणिकाची कथा काय तेथे ॥
तुझी भेट घेणे काय हो मागणे । आशेचेही शून्य केले तेणे ॥
निराशेचा गाव दिधला आम्हाशी । प्रकृती भावाशी सोडीयेले ॥
पतिव्रता मन पतिशीच भेटो । तैसे आम्ही विठोमाजी नांदो ॥
विश्व हे विठ्ठल दूजे काही नाही । देखणे तुझे ही तुजमाजी ॥
तुज ही विठ्ठल हवा ऐसा वाटे । परी एक मोठी आवडीची ॥
सद्गूरू श्री रामदासाचे भाषण । तेथे घाली मन चळू नको ॥
बहुतांची वृत्ती चाळविली जेव्हा । रामदास्य तेव्हा घडे केवि ॥
तुका म्हणे बापा चातुर्य सागरा । भक्ति एक थारा भाविकांसी ॥
तुम्हांपाशी आम्हां येऊनिया काय । वृथा शिण आहे चालण्याचा ॥
मागावे हे अन्न तरी भिक्षा थोर । वस्त्राचाही थार चिंध्या बिदी ॥
निद्रेसी आसन उत्तम पाषाण । वरी हे प्रावर्ण आकाशाचे ॥
तेथे काय करणे कोणाचाही आस । वाया होय नाश आयुष्याचा ॥
राजगृहा यावे मनाचिया आशे । तेथे काय वसे समाधान ॥
राजाचिये गृही भाग्यवंता मान । इतरां सन्मान नाही तेथे ॥
देखोनिया वस्त्राभूषणाचे जन । तत्काळ मरण येते आम्हां ॥
ऐकोनिया मनी उदासावे जरी । तरी आम्हां हरी उपेक्षि ना ॥
आता हेची तुम्हां सांगेन कौतुक । भिक्षेएवढे सुख नाही नाही ॥
तपव्रतयोगे महा भले जन । आशाबद्ध लीन वर्तताती ॥
तुका म्हणे तुम्ही श्रीमंत मानाचे । पूर्वील देहीचे हरीभक्त ॥
आता एक योग साधावा हा नीट । भल्याचाही वीट मानू नये ॥
जेणे योगे तुम्हां लागू पाहे दोष । असा हा सायास करू नको ॥
निंदक दूर्जन सांगाती असती । त्यांच्या युक्ती चित्ती आणू नका ॥
परिक्षावे कोण राजाचे सेवक । विवेकाविवेक पाहूनिया ॥
सांगणे नलगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य होशी ॥
हेची ऐकोनिया पावे समाधान । आता या दर्शना काज नाही ॥
घेऊनिया भेटी कोणा हा संतोष । आयुष्याचे दिवस गेले गेले ॥
एक-दोन कर्मे जाणॉनिया वर्मे । आपुलिया भ्रमे राहे आता ॥
कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वांभूति देख एक आत्मा ॥
आत्मारामी मन ठेवूनिया राहे । रामदास पाहे आपणची ॥
तुका म्हणे राया धन्य धन्य स्थिती । त्रैलोक्य ही ख्याती कीर्ति तुझी ॥
राया छत्रपती ऐकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥
रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्याशी तनमन अर्पी बापा ॥
मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥
रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥
उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालीक ॥
तोची बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥
आता धरू नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥
धरू नको आशा आमची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥
तुझी चाड आम्हां नाही छत्रपती । आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे ॥
चारी दिशा आम्हां भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥
पांडुरंगी झाली अमुची हे भेटी । हातात न रोटी दिली देवे ॥
आता पडू नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हां कधी हरी उपेक्षि ना ॥
शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरु शरण राहे बापा ॥

संदर्भ : तुकारामगाथा : (संपादक- त्र्यंबक हरी आवटे)
(© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com यांच्या सौजन्याने)