दि. २८ डिसेंबर २०१० सांयकाळ चा किस्सा दादरच्या एस के बोले रोडवर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा घेत उभा होतो. पदपथाच्या कडेला कपाळावर शेंदुराचा नाम लावलेल्या तारुण्याच्या भरात असलेल्या एका व्यक्तीला एका परप्रांतीय मालकी असलेल्या गाडीने धक्का दिला. क्षणात त्या शेंदूरधारी व्यक्तीचा स्व जागा झाला आणि त्यांनी त्या साठीच्या घरात असलेल्या व्यक्तीच्या मुस्कटात लगावली आणि वरून आवाज नकोय फटके देऊ असे सुनावले गाडी चालवणारा मालक त्या वयस्कर व्यक्तीचा पुत्र होता व तो माझ्या वडिलांना मारू नका चुकी माझी आहे अशी विनवणी करत होता तरीही ह्या मी मराठी म्हणणाऱ्या शेंदुर्धारी व्यक्तीची गुर्मी कमी होत नव्हती.
कधी कधी आपण मराठी असल्याचा गर्व आपणास अति होतो आणि त्या गुर्मितून अश्या प्रकारच्या घटना आपल्यासमोर घडत असतात. आपली हि मराठी असल्याची ताकद आपण आपल्या मराठी बांधवाच्या विधायक कार्यासाठी जर वापरली तर मराठी समाजाचे पर्यायाने महाराष्ट्राचा विकास नक्की करू.
आता कालची घटना घ्या, काल पुणे महानगरपालिकेत राडा झाला. राडे करणारे कोण तर सर्वपक्षीय मराठे कारण काय तर दादोजी कोंडदेव. संभाजी ब्रिगेड समाजामध्ये दुही पसरवण्याचे काम करतय, याची जाणीव समस्त मराठा समाजाला आहे आणि असणारच. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद संभाजी ब्रिगेडने सुरु करून मराठा समाजाला वेठीस धरले आहे. मुळात ब्राह्मण समाज शांतताप्रिय, हुशार, संयमी व प्रामाणिक आहे याची प्रचीती इतिहास देत आहे व मी जवळून ब्राह्मणी समाज अनुभवलाय, निरीक्षण केलेय.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना जातीभेद केला नाही, उलट स्वराज्यात मुसलमानाचा सुद्धा समावेश करून घेतला होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ब्राह्मणी चेहरे होते व वेळोवेळी त्यांची सल्लामसलत करूनच शिवाजी महाराज निर्णय घेत होते याही साक्ष इतिहास देत आहे. मग दादोजी कोंडदेव यांना लक्ष्य करून समस्त ब्राह्मणी समाजाला त्रास द्यावयाचा हे कशात बसते.
मुळात आपल्या सगळ्या मराठी जनाची मानसिकता आपण सर्वांनी तपासण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. जे राष्ट्र इतिहास विसरते ते राष्ट्र लयास जाते, अशा प्रकारे संतानी इतिहासाचे महत्व वर्णन केले आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या देशाचा इतिहास जो काही आहे तो इतिहास हा त्या त्या वेळी त्या वेळच्या बखरकारांनी नमूद करून ठेवलेला आहे. हा सर्व इतिहास बदलण्याचा आपल्याला काय अधिकार? आणि यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून अट्टाहास करून हिंसा करावयाची आणि इतिहास बदलण्यास भाग पाडावयाचे.
कुणीही संघटना काढावी व त्या संघटनेच्या जोरावर दहशतवाद पसरवायचा आणि जनतेला चुकीचा मार्गदर्शन
करायचे व त्यातून हिंसेचा मार्गाचा अवलंब करून आपला उद्देश्य सध्या करायचा हे कुठवर चालणार.
मी मराठी म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा अभ्यास करून जाब विचारण्याची वेळ आली आहे अन्यथा
हा चुकीचा पायंडा पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सुरु झालेला आहे आणि याला वेळीच पायबंद घातला
गेला नाही तर महाराष्ट्राची प्रगती होणार नाही याची प्रकर्षाने नोंद घ्यावी लागेल.
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=7183644
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=7183644
२ टिप्पण्या:
लेख उत्तम जमला आहे. मुद्दा सुद्धा रास्त आहे. केवळ स्वत:च्या राजकीय आकांक्षांच्या पूर्ततेसाठी जनतेचा बळी देण्याची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची 'नीती' सुपरिचित आहेच. मराठा जातीला हाताशी धरून कॉंग्रेसने महाराष्ट्रात गेली ६० वर्षे केलेले राजकारण आणि शिवसेना, मनसे सारख्या पक्षांनी निर्माण केलेली भोंगळ मराठी अस्मिता हीच अंती मराठी समाजाचे नुकसान करत आहे. प्रश्न इतकाच आहे की, "मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ???
लेख चांगला आहे, समाजात फुट पाडणाऱ्या प्रवृत्तीला ठेचले पाहिजे.
टिप्पणी पोस्ट करा