सुस्वागतम्

निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

मी मराठी

दि. २८ डिसेंबर २०१० सांयकाळ चा किस्सा दादरच्या एस के बोले रोडवर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा घेत उभा होतो. पदपथाच्या कडेला कपाळावर शेंदुराचा नाम लावलेल्या तारुण्याच्या भरात असलेल्या एका व्यक्तीला एका परप्रांतीय मालकी असलेल्या गाडीने धक्का दिला. क्षणात त्या शेंदूरधारी व्यक्तीचा स्व जागा झाला आणि त्यांनी त्या साठीच्या घरात असलेल्या व्यक्तीच्या मुस्कटात लगावली आणि वरून आवाज नकोय फटके देऊ असे सुनावले गाडी चालवणारा मालक त्या वयस्कर व्यक्तीचा पुत्र होता व तो माझ्या वडिलांना मारू नका चुकी माझी आहे अशी विनवणी करत होता तरीही ह्या मी मराठी म्हणणाऱ्या शेंदुर्धारी व्यक्तीची गुर्मी कमी होत नव्हती. 
        कधी कधी आपण मराठी असल्याचा गर्व आपणास अति होतो आणि त्या गुर्मितून अश्या प्रकारच्या घटना आपल्यासमोर घडत असतात.  आपली हि मराठी असल्याची ताकद आपण आपल्या मराठी बांधवाच्या विधायक कार्यासाठी जर वापरली तर मराठी समाजाचे पर्यायाने महाराष्ट्राचा विकास नक्की करू.
        आता कालची घटना घ्या, काल पुणे महानगरपालिकेत राडा झाला.  राडे करणारे  कोण तर सर्वपक्षीय मराठे  कारण काय तर दादोजी कोंडदेव. संभाजी ब्रिगेड समाजामध्ये दुही पसरवण्याचे काम करतय, याची जाणीव समस्त मराठा समाजाला आहे आणि असणारच.   ब्राह्मण आणि   ब्राह्मणेतर असा वाद संभाजी ब्रिगेडने सुरु करून मराठा समाजाला वेठीस धरले आहे.  मुळात ब्राह्मण समाज शांतताप्रिय, हुशार, संयमी  व प्रामाणिक आहे याची प्रचीती इतिहास देत आहे व मी जवळून ब्राह्मणी समाज अनुभवलाय, निरीक्षण केलेय.      
     शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना जातीभेद केला नाही, उलट स्वराज्यात मुसलमानाचा  सुद्धा समावेश करून घेतला होता.  शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ब्राह्मणी चेहरे होते व वेळोवेळी त्यांची सल्लामसलत करूनच शिवाजी महाराज निर्णय घेत होते याही साक्ष इतिहास देत आहे.  मग दादोजी कोंडदेव यांना लक्ष्य करून समस्त ब्राह्मणी समाजाला त्रास द्यावयाचा हे कशात बसते. 
     मुळात आपल्या सगळ्या मराठी जनाची मानसिकता आपण सर्वांनी तपासण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.  जे राष्ट्र इतिहास  विसरते ते राष्ट्र लयास जाते, अशा प्रकारे संतानी इतिहासाचे महत्व वर्णन केले आहे.  आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या देशाचा इतिहास जो काही आहे तो इतिहास हा त्या त्या वेळी त्या वेळच्या बखरकारांनी नमूद करून ठेवलेला आहे.  हा सर्व इतिहास बदलण्याचा आपल्याला काय अधिकार? आणि यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून अट्टाहास करून हिंसा करावयाची आणि इतिहास बदलण्यास भाग पाडावयाचे.  
कुणीही  संघटना काढावी व त्या संघटनेच्या जोरावर दहशतवाद पसरवायचा आणि जनतेला चुकीचा मार्गदर्शन 
करायचे व त्यातून हिंसेचा मार्गाचा अवलंब करून आपला उद्देश्य सध्या करायचा हे कुठवर चालणार.  
मी मराठी म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा अभ्यास करून जाब विचारण्याची वेळ आली आहे अन्यथा   
हा चुकीचा पायंडा पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सुरु झालेला आहे आणि याला वेळीच पायबंद घातला 
गेला नाही तर महाराष्ट्राची प्रगती   होणार नाही याची प्रकर्षाने नोंद घ्यावी लागेल.  
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=7183644

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

राहुल गांधी यांस अनावृत्त पत्र

       राहुल बाळा, तू वयाची चाळीशी गाठलीस पण तुझा बालपणीचा अल्लडपणा अजून गेलेला दिसत नाही. अन्यथा एखाद्या परदेशी राजदुतासमोर तू आपल्याच देशबांधवांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्यांच्यावर आरोपांची चिखलफेक केली नसतीस. मागे तू म्हणे भारताचा ‘शोध’ घेण्यासाठी देशभर हिंडलास. इतकेच नव्हे तर दलिताच्या घरी जेवून, तू बातमीसाठी हपापलेल्या आणि सतत कुत्र्याप्रमाणे तुझ्या अवती-भवती फिरणाऱ्या पत्रकारांना ‘ब्रेकिंग न्यूज’ दिलीस. अगदी काही दिवसांपूर्वी तू सुद्धा देशातील ‘सर्वसामान्य’ लोकांप्रमाणेच ट्रेन मधून प्रवास केल्याचे कळते. अरे मग एवढे फार्स करून सुद्धा तुला आपला देश, इकडची संस्कृती कळली नाही का?  

   

        तुझे खापरपणजोबा मोतीलाल नेहरू हे तत्कालीन काँग्रेसमधले वजनदार आणि प्रगल्भ नेतृत्व समजले जाई. त्यांचा वारसा उचलणारे तुझे पणजोबा आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी उच्चशिक्षण घेतले ते विदेशातच. त्यानंतर क्रमश: तुझी आजी इंदिरा गांधी, तुझे वडील आणि काका, राजीव व संजय गांधी यांच्यावर सुद्धा भारतीय संस्कृती आणि शिक्षणपद्धतीपेक्षा पाश्चात्य विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. तुझ्या मातोश्री आणि तुम्ही दोघेही भावंड यांना ‘भारतीय’ म्हणावे का, असा प्रश्न आम्हाला सुरवातीला पडलेला. 

       मग हळुहळू वाटायला लागल की, जरी तुम्ही परदेशी असलात तरी भारतीय मूल्यांचा तुमच्यावर सुद्धा प्रभाव पडला आहे. अरे खरचं.....!!!  अस कर ना, तू तुझ्या पणजोबांनी लिहिलेले ‘भारताचा शोध’ हे पुस्तक वाच. त्यांनी शक, हूण, कुशाण इथपासून मुघल राजा अकबर या सर्व बुभुक्षित विदेशी आक्रमकांचे भारतीय तत्त्वज्ञानामुळे झालेले हृदयपरिवर्तन मोठ्या गौरवाने लिहिले आहे. हे वाचताना कदाचित तुझी नजर नेहरूंनी केलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या उल्लेखावर जाईल. पण शिवाजी महाराजांचा तुझ्या आजोबांनी ‘वाट चुकलेला देशभक्त’, असा उल्लेख हा केवळ ‘प्रिंटिंग मिस्टेक’ आहे, असे समजून तू तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करशील याची खात्री मला आहेच. 

अरे मुद्दा भरकटलो बघ..!! थोडक्यात काय तर असा आमचा देश. आता तुच त्याला आपला मानतोस की काय, ते मला माहीत नाही. पण तुझा गृहपाठ खूपचं कच्चा असल्याचे जाणवले. हिंदू सहनशील वगैरे आहेत खरे, पण त्यांचे मर्दानी रूप मुघल आणि इंग्रजांनी अनुभवले आहे. आम्ही शूर असलो तरी क्रूर नाही बर का? मग आम्ही आमच्याच देशात बॉम्बस्फोट घडवू, असा जावईशोध तुला कसा लागला बरे? भारत भ्रमण करताना एखादा बॉम्बनिर्मिती कारखाना तर नाही ना पाहिलास?

        अरे १९४७ सालापासून आजगायत आमच्या देशावर भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या अब्रुची लक्तरे आत्ता कुठे जागतिक वेशीवर टांगली जात असताना तू हिंदुंना आणि पर्यायाने समस्त भारतीयांनाच अतिरेकी कसे ठरवू शकलास? आम्ही ज्या भगव्या ध्वजाची शान मिरवतो ना, तो ध्वज अशी पुचाट कृत्य करण्याची बुद्धी आम्हाला कधीच देणार नाही. राहता राहिला प्रश्न तुझ्या वक्तव्यांचा. त्यावर तू महात्मा गांधींचे विचार नक्की वाच. तू आमूलाग्र बदलशील.

        हिंदू संस्कृती, परंपरा आणि हिंदू मन यांचा नेमका अर्थ तुला जेव्हा कळेल, तेव्हाच तू राजकारण करू शकशील. त्यासाठी तू इथल्या जनतेशी, त्यांच्या भावविश्वाशी आणि समस्यांशी समरसून जायला हवे. तरच कदाचित तुला राजकीय परिपक्वता येईल.